
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबादकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज
: शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होत आहे.
गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेली जय्यत तयारी शिवसेनेकडून पूर्ण झाली आहे. संभाजीनगरकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
तयारीची पाहणी करतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सहसंपर्कप्रमुख त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, महिला आघाडीच्या संपर्क संघटक डॉ. मनीषा कायंदे, विशाखा राऊत, मीना कांबळी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, गजानन बारवल, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, विश्वनाथ स्वामी, प्राजक्ता राजपूत,माजी नगरसेवक सचिन खैरे, गिरीजाराम हाळनोर आदीसह नागरिक उपस्थित होते.