
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा -संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सातारा जिल्ह्यांत दिनांक २८ जून ते ४ जुलै या कालावधीत मार्गक्रम करणार आहे या कालावधीत सोहळयांचा काही ठिकाणी मुक्काम असणार आहे. जिल्हा प्रशासनाकडूंन जय्यत तयारी पालखी सोहळ्यांचा जिल्ह्यांतील पुढील प्रमाणे कार्यक्रम असा राहणार आहे दि. २८ जून रोजी सकाळी नीरा नदी पूल येथे सकाळचा विसावा दुपारचा नैवेद्य तसेच दुपारचा विसावा राहील तर पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी राहणार आहे २९ जून रोजीही लोणंद तेथेच मुक्कामी असून दि.३० रोजी लोणंद येथून चांदोबाचा लिंबकडे प्रस्थांन होणार आहे त्या ठिकाणी उभे रिंगण सोहळा होईल व दुपारचा विसावा त्यानंतर पालखी तरडगाव येथे मुक्कामी जाईल. दि.१ जुलै रोजी तरडगाव येथून प्रस्थान करुन काळच मधील दत्त मंदिर येथे सकाळचा विसावा निंभोरे ओढा येथे दुपारचा निवेदन वडजल व फलटण दूध डेअरी येथे दुपारचा विसावा राहील. त्यानंतर फलटण विमानतळ येथे पालखीचा मुक्काम राहील त्यानंतर दि३ जुलै रोजी फलटण येथून पालखीचे प्रस्थांन होणार आहे विडणी येथे सकाळचा विसावा पिंपरद येथे दुपारचा नैवद्य निंबळक फाटा येथे दुपारचा विसावा तर रात्रीचा मुक्काम बरड येथे होणार आहे. दि.४ जुलै रोजी बरड येथून पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थांन करेल साधुबुवाचा ओढा येथे सकाळचा विसावा धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनलजवळ दुपारचा नैवद्य , शिंगणापूर फाटा (पानसकरवाडी) येथे दुपारचा विसावा तर रात्रीचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यांतील नातेपुते येथे होईल त्यानंतर माऊलींच्या पालखीचे प्रस्थांन हे सोलापूर जिल्ह्यांत राहील