
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार,९ जून रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील पहिल्या बायोटेक स्टार्टअप एक्स्पो २०२२ चे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान हे देखील उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. गेल्या आठ वर्षांत भारताची जैव-अर्थव्यवस्था आठ पटीने वाढली असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले आहे.