दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवी सरकार इंगळी
श्री व सौ,संगीता शामराव जाधव यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साहित्य संमेलन संपन्न झाले. संमेलन अध्यक्ष मा .आमदार भगवान सांळुखे पुणे शिक्षक मतदार संघ यांनी भूषवले.स्वागताध्यक्ष मा,पंकज माने हे होते.संमेलन कार्याध्यक्ष सरपंच मा,महादेव माने होते.संमेलनासच्या मुख्य आयोजिका सौ,श्लेषा कारंडे होत्या.
संमेलनात मा,शामराव जाधव व सौ ,संगीता जाधव,मा,सरपंच महादेव माने, तसेच,बाबरमाची,राजमाची या गावातील सरपंच, पोलिस पाटील ,ग्रा.प.सदस्य, यांचा कै,सौ,सुरेखा महादेव माने यांचे स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..
दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींनी सहभाग नोंदवून कविता सादर केल्या.यात कवि सरकार इंगळी, मा,डाॉ,सुरेश कुराडे,गडहिंग्लज, मा,कवी,डा ,लक्ष्मन हेंबांडे,मंगळवेढा, बाबा जाधव रूई,बाळासाहेब गिरी,सिराज शिकलगार, योगीता कोठेकर निगडी पुणे, डा,अनिता खेबूडकर मिरज,सुवर्णा पवार,उर्मिला तेली कोल्हापूर, वेदा माळकर कोल्हापूर, मा,मधूकर हुजरे, अशोक,पवार कडेगाव, सो,प्रतिभा गजरमल सातारा चंद्रकांत देसाई आदी कविनी बहारदार कविता सादर केल्या. तिसऱ्या सत्रात मा,कथाकथनकार शांतीनाथ मांगले बलवडी यांनी ग्रामीण भागातील अनेक प्राणी पक्षी जनावरांचे हुबेहूब आवाज काढून हशा पिकवला..शेवटी श्लेषा कांरंडे यांनी आभार मानले.
