
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
अनु जाती जमाती विजा भज इमाव विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी–कर्मचारी संघटनेचे मंत्रालय मुंबई या संघटनेचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा. भारत वानखेडे यांच्या ५० वा सुवर्ण महोत्सव वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे एका शानदार सोहळ्यात मा. भारत वानखेडे यांच्या सुविद्या पत्नी सौ. उज्ज्वलाताई भारत वानखेडे यांच्यासह लोहयाच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार अनु जाती ,जमाती, विजा, भज, इमाव, विमाप्र , शासकीय-निमशासकीय अधिकारी–कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई भारत वानखेडे प्रणित जलसंपदा विभागाच्या शाखेचे प्रदेशाध्यक्ष बी.बी. गायसमुद्रे, संघटनेचे राज्य महासचिव डॉ. उत्तम सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे यांच्या वतीने करण्यात आला.
भारत वानखेडे यांनी अनु जाती जमाती विजा भज इमाव विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी–कर्मचारी संघटना मंत्रालय काढून तीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केला.
अनु जाती जमाती विजा भज इमाव विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी–कर्मचारी संघटना यांची निर्मिती करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना न्याय हक्क मिळवून दिला अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनाचा प्रश्न असो की, पदोन्नतीचा असो यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत तसेच सामाजिक क्षेत्रात ही ते सदा अग्रेसर असतात तेव्हा या लाडक्या नेत्याचे आरोग्य चांगले निरोगी रहावे त्यांना लढण्यासाठी बळ मिळावे त्यांचा लोहा नगरीचे शिल्पकार प्रथम नगराध्यक्ष दिवंगत माणिकराव पाटील पवार यांनी सुरू केलेल्या खारिक खोबऱ्याच्या हाराने मुंबई मंत्रालय येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य बी.बी. गायसमुद्रे , डॉ. उत्तम सोनकांबळे, ओबीसीचे जेष्ठ नेते रामचंद्र येईलवाड,पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच भारत वानखडे यांचा मुंबई मंत्रालयासहित महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी भव्य सत्कार केला. तसेच डॉ.बाबासहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी बाईट द्वारे शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण मा . भदंत बोधीशील स्ववीर व भिक्खू संघ मुंबई यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून अभिवादन करुन सामुदायिक रीत्या पंचशील,त्रिशरण, बुद्धवंदना घेण्यात आली.
तसेच प्रसिद्ध भारतीय भीम शाहरा सीमाताई पाटील व दिग्दर्शक जॉली मोरे यांचा प्रबोधन पर बुध्द, भीमगीत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रबोधनाचा उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच यावेळी या कार्यक्रमाला व भारत वानखेडे यांना दलित पँथरचे संस्थापक मा. ज्येष्ठ साहित्यिक ज वि. पवार, महामहिम राज्यपालांचे माजी उपसचिव डी.के. खाडे, उद्योजीका पद्मश्री कल्पनाताई सरोज, वित्त विभागाचे माजी सह सचिव ज्यो.रसाळ, मंत्रालयीन मॅको बॅंकेचे चेअरमन प्रमोद पंडीत,(अध्यक्ष संचालक मंडळ मॅको बॅक मंत्रालय मुंबई), सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव संजय सोवणे, उपसचिव उर्जा विभाग नारायण कराड, चंदांशिवे अवर सचिन रोजगार हमी विभाग,मा. उपायुक्त एम जी कांबळे, उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे स्वीय सहाय्यक नितीन सवडतकर , माननीय नामदार श्री संजय बनसोडे सा .बा ,पाणी पुरवठा राज्यमंत्री यांचे. स्वीय सहाय्यक राजेंद्र सोनकांबळे, शालेय शिक्षण मंत्री मा. प्रा . सौ. वर्षाताई गायकवाड, यांचे सवीय सहाय्यक मनोहर कांबळे, रो .ह. यो. मंत्री मा.ना.श्री. संदिपान भूमरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुबोध भारत, माजी राज्यमंत्री वने व आदिवासी मा. श्री . राजे अंबरीश राजे , सीपिंग कार्पोरेशन भारत सरकार डेप्युटी जनरल मॅनेजर संतोष मेश्राम, राज्य उपाध्यक्ष सुभाष गवई, राज्य कोषाध्यक्ष सी आर निखारे, राज्य उपाध्यक्ष विजय राज्य उपाध्यक्ष भास्कर बनसोडे नांदेकर,संघटन सचिव डॉ. एन.डी.पाटील, यांनी शुभेच्छा दिल्या.
भारत वानखेडे यांचा ५० वा सुवर्ण महोत्सव अभिष्टचिंतन सोहळामुळे त्यांना भारत वानखेडे यांना भ्रमणध्वनी द्वारे उर्जा मंत्री नितीन राऊत, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, पर्यावरण व बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री राजे अंबरीश राव माजी आमदार प्रा जोगेंद्र कवाडे सर, मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या तसेच आपले स्वीय सहाय्यक यांना कार्यक्रमाला पाठवून शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी प्रसिद्ध साहित्यिक जे.वि.पवार लिखित बाबासाहेबांच्या चारित्र्य लेखणातील उणीवा या पुस्तकाचे प्रकाशन उद्योजीका पद्मश्री कल्पनाताई सरोज यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच भारत वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यात प्रसिद्ध साहित्यिक ज. शि.पवार यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले., आचार्य रतनलाल सोनग्रा सर यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले, राजीव खांडेकर संपादक एबीपी माझा यांना पत्रकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे., तर अर्चना दिलीप सोंडे संस्थापक युक्ती मिडिया माध्यम समन्वयक जेष्ठ समाजसेविका यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. डॉ. कर्नल मेश्राम तज्ञ रक्त कर्क रोग यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण वैद्यकीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सुशिम नामदेव कांबळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सचिन पाटील संपादक महाबोधी न्युज चॅनेल यांना पत्रकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाला भारत वानखेडे यांच्या मातोश्री सुमनबाई वानखेडे, पत्नी सौ. उज्ज्वलाताई भारत वानखेडे,मुले आदित्य व आयुष यांच्या सहीत संघटनेचे पदाधिकारी मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच अभिष्टचिंतनाचा कार्यक्रमा नंतर स्वादिष्ट स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.