
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
ओम नारायण वाकळे या चिमुकल्याच्या हस्ते मंदिर व कब्रस्थान येथे श्रीफळं फोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात…
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य नारायण पाटील वाकळे यानी स्वखर्चाने लासूर स्टेशन येथील देवगाव रोडवरील सोनापूर मुस्लिम कब्रस्थान येथे पेव्हर ब्लॉकचा रस्ता व वॉर्ड क्रमांक पाचमधील दायगाव रोडवरील लक्ष्मीमाता मंदिराच्या आवारात पेव्हर ब्लॉक व सुषभीकारण कामाचा शुभारंभ आज ओम नारायण वाकळे या चिमुकल्याच्या हस्ते करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे..
दरम्यान ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील वाकळे यानी पावसाळ्यापूर्वी रस्ता व सुशोभीकरण काम करून देण्याचे वचन नागरिकांना दिले होते ते आज प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी वाकळे यांचे आभार मानले यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक आदिन्साह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती..