
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : एकदाचा कोरोना गेला या अविर्भावात सगळेजण बिनधास्त राहत असताना कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता दर्शवली आहे.
मे महिन्यात कोराना रूग्णाची संख्या कमी होती, पण आता कोराना बाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. २२५ पेक्षा अधिक रूग्ण या दोन दिवसात जिल्ह्यात आढळून आलेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून रूग्णसंख्येत वाढ होत आहे. बाधितांचा दर ४.६ टक्क्यांवर गेल्याचं सांगितलं जात आहे. जिल्ह्यातील चाचण्या वाढवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेत. तालुक्याच्या ठिकाणी कोवीड रूग्णालय सुरू आहे.
सर्वाधिक रूग्ण ३१-४० वयोगटातील असून त्यापैकी ३१८ जणांचं लसीकरण झालं आहे. गुरूवारपर्यंत ५८५ केसेस सक्रिय असून बहुतेक नागरिकांचं लसीकरण झाल्याने रूग्णामध्ये गंभीर लक्षणे नसल्याचं सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितलं आहे. मास्क सक्ती होते शकते.