
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी:- दशरथ आंबेकर
गेल्या चार महिन्यांपासूनउन्हाची लाहीअन उकाड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना आज शनिवार दि.११/०६/२०२२रोजी सांयकाळी अचानक मेघ दाटून आले आणि ईस्लापुर,जलधारा,शिवणी परिसरात वादळवारे मेघगर्जनेसह तासभर जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.मर्ग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वानांच दमदार पावसाची प्रतिक्षा होती,अर्धा जून महिना संपत आला तरी उन्हाचा पारा चढला होता व उकाड्यांचा कहर कायमअसताना शनिवारी दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. वादळीवाऱ्यासह मेघगर्जना होवून आधी हलक्या नंतर मध्यम व जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. वादळ वाऱ्याला सुरुवात होताच ग्रामीण भागातील वीज पुरवठा बराच काळ खंडित होता.भारतीय हवामान खात्याने समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीची घाई करू नका, असेआव्हान केलेआहे.बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी,मशागतीची कामे पूर्ण केलेआहेत.महागडी बी-बियाणे, खताची साठवण करूनअनेक कोरडवाहू शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहे.