
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
अवधा (नांदुरा)दि.१२.बुलढाणा जिल्ह्यात अवैध रित्या रेती उपसा करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर हैदोस असल्याचं चित्र बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील अवधा येथील नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.. याबाबत अवैध वाहतुकीचा व्हिडिओ काढणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला रेती माफियांकडून त्यांच्या घरी येऊन दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा हद्दीतील अवधा या गावातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असताना गावातील प्रत्रकार राहुल खंडेराव यांनी ट्रॅक्टरचा व्हिडिओ काढला.. त्यानंतर चिडून जाऊन या रेती माफिया कडून या सामाजिक कार्यकर्त्याला दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.. त्यामुळे एकंदरीतच या वाळू माफियांना नेमकं कुणाचं अभय मिळत आहे ? महसूल प्रशासन झोपल आहे का?असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा नदी पात्रातून हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन होत असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. असे असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प असल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय.