
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
—————————————————————-
नांदेड – उत्तर विधानसभा मतदारसंघात आ. बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मान्सून तोंडावर आल्यामुळे प्रगतीपथावरील विकास कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. रविवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी वाघी येथील पुल, राहटी गावातील मुख्य रस्ता तसेच राहटी ते पिंपळगाव (को.) या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे.
पुढील दोन-तीन दिवसात मान्सून आपल्याकडे दाखल होणार असल्याचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सर्वत्र शेती कामांना वेग आला आहे. जर प्रगतीपथावरील विकास कामे अर्धवट राहिली तर शेतकऱ्यांना त्याबरोबरच ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे रविवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी मतदार संघातील प्रगतीपथावरील विकास कामांची पाहणी केली आहे. यावेळी नाळेश्वर रस्ता ते वाघी गावाला जोडल्या जाणार्या रस्त्यावर पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. जर या पुलाचे अर्धवट काम राहिले तर पावसाळ्यात वाघी येथील नागरिकांना नांदेडला येण्यासाठी तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. तसेच राहटी गावातील मुख्य रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या देखील कामाची पाहणी आ. बालाजी कल्याणकर यांनी केली आहे. त्याबरोबरच राहटी ते पिंपळगाव (को.) या गावांना जोडणार्या रस्त्याचे देखील काम प्रगतिपथावर आहे. हा रस्ता मुख्यतः शेतकऱ्यांना सोयीचा ठरतो. त्यामुळे मान्सूनपूर्व या रस्त्याचे देखील काम झाले पाहिजे, त्या बरोबरच कामाचा दर्जा देखील चांगला ठेवा आणि तात्काळ कामे करून घ्या अशा सूचना संबंधित ठेकेदाराला आ. बालाजी कल्याणकर यांनी केल्या आहेत. त्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ही कामे तात्काळ पूर्ण करून घ्या अशा सूचना केल्या आहेत.