
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
पंढरपूर. पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीनिमिंत्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी समितीकडूंन आज मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी महापूजेचे निमंत्रण देण्यांत आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रण स्वीकारले. त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमिंत्त महापूजेसाठी उपस्थितीत राहणार असल्यांचे मुख्यमंत्री यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी समिती कमिटीला सांगितले. महाराष्ट्रांचे नूतन मुख्यमंत्री हे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यांचे भूमिपुत्र असून. सातारा जिल्ह्यांला चौथ्यांदा मुख्यमंत्री पद मिळाले असून यांत सातारकरासह कोल्हापूर ,सांगली, पुणे यास संपूर्ण महाराष्ट्रभरांतुन जनतेतून आनंदमय वातावरण सध्या दिसून येत आहे. आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेची वार्षिक महापूजा ही नूतन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून यांचे निमंत्रण आज विठ्ठल रुक्मिणी समितीकडूंन त्यांना त्यांच्या निवासस्थानी देण्यांत आले. यावेळी मान्यनीय मुख्यमंत्र्यांनी रुक्मिणी समिती कमिटीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत निमंत्रणाचा स्वीकार केला