दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेवून पुणेकर पर्यटकांना सुखद धक्का दिला आहे. पुणे शहरासह देशातील प्रमुख रेल्वे मार्गावर वंदेभारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या एक्स्प्रेस गाडीची वेग क्षमता ताशी १८० कि.मी. असून पुणे ते दौंड सेक्शन १३० कि.मी साठी सक्षम आहे. पुणे सिकंदराबाद एक्स्प्रेस शताब्दी ऐवजी आता ही वंदेभारत एक्स्प्रेस गाडी धावणार आहे. घोरपडी यार्डाजवळ ९० कोटी रूपयांचा एक नवा कोचिंग डेपो उभारला जाणार असून एकाच वेळी पाच रेकची देखभाल दुरुस्ती साठीची क्षमता या डेपोची आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पुणेकर जनतेमध्ये संतोषजनक व आनंददायी वातावरण आहे.
