दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या उत्सवा दरम्यान विठूमाऊलीच्या दर्शनाकरिता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करतात. त्यांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वे सेवा ९ जुलैपासून सुरू होणार आहे.
*जालना – पंढरपूर – जालना विशेष रेल्वे सेवा:* गाडी क्रमांक ०७४६८ आषाढी एकादशी विशेष जालना स्थानकावरून ९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटाने निघेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटाने पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०७४६९ विशेष गाडी १० जुलैला रात्री ८ वाजून ३० मिनिटाने पंढरपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता जालन्याला पोहोचेल.
