
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
२०१४ ते २०१९ तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघासाठी किती निधी मिळविला गेला,याबाबत मी कधीही बोलणार नाही,परंतु विद्यमान सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत विविध विकास कामे केली जातील,तसेच गत ७० वर्षांत अनेक कामांना निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत अर्धवट आहेत,ती कामे का अर्धवट आहेत? याबद्दल मी प्रकर्षाने कदापि बोलणार नाही,परंतु आगामी काळात कुठल्याही कामासंदर्भामध्ये निधी कमी पडू देणार नाही. यासाठी लोहा-कंधार मतदारसंघातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कामे सुचवावीत व तात्काळ पूर्ण करण्याबाबत मला साथ द्यावी.
तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देणे गरजेचे असून रमाई घरकुल योजनेतील कामेही तात्काळ गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण ठरणारी वॉटर ग्रीड योजना पुनश्च कार्यान्वित झाली असून,यात कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे पूरग्रस्तस्थिती निर्माण होणारे पाणी हे मराठवाड्याला वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कडक सूचना केल्या असून याचा जास्तीतजास्त फायदा आपल्या मतदारसंघाला मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असेन.
या राज्यात व मतदारसंघात आपल्या शेतकरी राजाच्या शेतीला दिवस काळात वीज वितरण हा महत्वाचा प्रश्न असून,या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी मतदारसंघात जीर्ण झालेले पोल बदलणे,तारा बदलणे,डीपी बदलणे ही सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करणार असून,शासकीय अधिकारी हे विकास कामांसाठी साथ देतातच हा माझा पिंपरी चिंचवड मनपा येथील गत ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी गती पकडणे गरजेचे असून सर्व प्रशासकीय अधिकारी आपले स्वतःचे संपूर्ण योगदान देतील ही मला अपेक्षा आहे.
त्यामुळे निश्चितपणे विकासात्मक कामांना योग्य दिशा मिळेल असे भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार यांनी सांगितले.
◆ मतदारसंघातील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत
◆ आगामी काळात मतदारसंघाचा झपाट्याने विकास करण्यासाठी अधिकाऱ्यानी आळस झटकून काम करावे.
◆ कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना माफी नाही.
◆ बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस न धरता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी गावोगावी कॅम्प लावावे. या कार्यात मन्याड फाऊंडेशन मदतीसाठी तत्पर असेल.
◆ 100 % पेक्षा जास्त कर्ज वाटप करणार्या बँक अधिकारी यांचा मन्याड फाऊंडेशनतर्फे सन्मान केला जाईल
◆ नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
◆ सन 2021 ते 2022 या वर्षात लोहा-कंधार तालुक्यातील केंद्र सरकार,राज्य सरकार व शेतकरी यांनी कोट्यवधींचा भरणा केला होता,मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे रक्कम न मिळता ठराविक रक्कम दिली गेली. गत दोन वर्षात केवळ 30% कर्ज वाटप झाले का? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असून,लवकरात लवकर पीकविमा कसा मिळवून देता येईल याबद्दल प्रयत्नशील असेल