दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-कवि सरकार इंगळी
इंगळी ता हातकणंगले येथील रूई इंगळी पुलाजवळ राहाणाऱ्या जवळपास २४ कुंटूंबाना महसूल विभागाने पंचंगंगा नदीपात्राबाहेर पाणी पडत असल्यामुळें पुराचा धोका ओळखून प्रशासनाने दक्षता म्हणून पुरापासून धोका टाळणेसाठी सर्तक राहाणे करीता नोटीसा देऊन खबरदारीचा इशारा दिला आहे.
कोल्हापूरसह इंगळी रुई परिसरांत जोरदार पावसाचा इशारा दिला असून गेल्या दोन दिवसात पाऊस चालू असलेने पंचगंगा नदी पात्रा बाहेर पाणी पडून नदीकाठची शेत जमिन व पिके पाण्याखाली गेली आहेत.त्यामुळे आता बऱ्याच पिंकांचे नुकसान झाले आहे. नदीची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी आपली नदी काठची जनावरांची वस्ती आहे अशा नागरीकांनी जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे अशा सुचना देणेत येत आहेत.
गेल्या चार पाच वर्षांत पुरामुळे इंगळीकरांचे शेतीसह प्रांप़चीक वस्तूचे नुकसान झाले होते.म्हणून नागरीकांची पुरात धावपळ होऊ नये म्हणून त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करावे अशा सुचना देणेत येत आहेत.
