
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी भाटनिमगाव येथील पंजाबराव महादेव गायकवाड तर उपाध्यक्षपदी जाऊद्दीन फक्रुद्दीन शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
इंदापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची २०२१-२२ ते २०२६-२७ च्या कालावधीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी संघाच्या कार्यालयामध्ये निवडणुकीचे आयोजन केले होते. यावेळी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत अध्यक्ष पदासाठी गायकवाड तर उपाध्यक्ष पदासाठी शेख यांची अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए बी.झांजरे यांनी जाहीर केले. इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली होती.नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे ,माजी चेअरमन छगनराव भोंगळे, दत्तात्रय शिर्के, कर्मयोगी चे संचालक रवींद्र सरडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी वि.प्र. अधिकारी शिंदे साहेब, इंदापूर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, सचिव महेश जगताप, युनुस पठाण तसेच इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक मकरंद जगताप, बाळासाहेब शिंदे अमर जगदाळे, बाळासाहेब मोरे, सचिन जाधव,जंयत जाधव, कैलास येरळकर, अमोल भोईटे, हरिदास जाधव, विष्णू देवकाते, प्रतापराव पालवे, राहूल मिसाळ, चंद्रकांत बोराटे, प्रतिभा पवार,फातेमा पठाण हे सर्व उपस्थित होते.यावेळी सहनिवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी सचिव उदय जगदाळे यांनी काम पाहिले.