
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
उस्मानाबाद :-येथील राष्ट्रीय युवा कवी तथा साहित्यिक श्री उत्कर्ष विठ्ठलराव देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा युवा क्षेत्रातील कर्याबद्दल युथ आयकॉन हा पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच त्यांना यापूर्वीच्या युवा महाराष्ट्र राज्य २०२१ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१९,२०२१ आणि २०२२ चा युवा कवी म्हणून पुरस्कार प्रदान झाला होता व त्यांचे शब्दसागर या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा अधिकारी मा.कौस्तुभ जी दिवेगावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वंत्रच कौतुक करण्यात येत आहे.