दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर.
पन्हाळागड ढासळतोय या विषयावर आज पन्हाळा गडावरच्या नागरिकांनी सांस्कृतिक कार्यालय पन्हाळा नगरपरिषद या ठिकाणी मीटिंग ठेवली होती.या मीटिंगसाठी संपूर्ण पन्हाळगडातले नागरिक, व्यवसायिक, पन्हाळगड संवर्धनासाठी उपस्थित होते.
या मीटिंगमध्ये विनायक गोलीवडेकर यांनी असे सांगितले की, सर्वात महत्त्वाची पहिले पन्हाळगड चे संवर्धन झालेच पाहिजे . तसेच दुसरे म्हणजे, लोकांचे उदरनिर्वाहाचा विषय पण महत्त्वाचा आहे , पर्यटन पण फार महत्वाचे आहे.तिसरा विषय हा पन्हाळगड तालुका ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी तालुका स्तरावरची सर्व कामे आजूबाजूच्या येणाऱ्या गावातील लोकांची सर्व प्रकारच्या सोय झाल्याच पाहिजे. तसेच याचा पाठपुरावा नेहमी करणे महत्त्वाचा आहे.एकदा मीटिंग घेऊन काम होणार नाही असे सुद्धा ते बोलले,
राजू सोरटे ,राष्ट्रीय बहुजन महासंघ अध्यक्ष, यांनी अशी मागणी केली की, पन्हाळगडावर जी सोशल मीडियावर जी बदनामी झाली आहे.या सोशल मीडिया जी लोक बदनामी करत आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. व पन्हाळागाव वासिया कडून त्यांचा निषेध झाले पाहिजे.
राजू मुल्ला,ज्येष्ठ गाईड, इथे स्थानिक लोक काय गडावर दारू पिऊन फिरत नाहीत जे येतात ते सर्व बाहेरचे लोक असतात. त्यामुळे पन्हाळगडाची बदनामी करण्याचा हक्क त्यांना नाही आहे. जी अशी लोक आहेत ती पाच टक्के च्या आसपास येणारी लोक आहेत . त्यांना पन्हाळगडाची रियल कंडिशन माहित नसल्यामुळे एक दोन जणांवर कारवाया झाल्यास की, अशा अफवा पोस्ट लोक करणार नाही. प्रशासनाने दारू पिऊन गडावर बाहेरचे लोक येतात त्यांच्यावर कारवाया करण्यात यावे.
माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांनी बोलताना मीटिंगमध्ये सांगितली की, गडाच्या संवर्धनाची योग्य दिशा देणे गरजेचे आहे.येत्या दोन दिवसात संपूर्ण एक चांगल्या प्रकारे निवेदन तयार करूया हे निवेदन संपूर्ण गावातल्या सह्या घेऊन मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना , भारतीय पुरातत्व खाते,व कोल्हापूरलातील तीन खासदारांना व संभाजीराजेंना तसेच मुख्यमंत्री यांना हे निवेदन देऊया कसा निधी उपलब्ध करून घेता येईल पन्हाळागडासाठी भारतीय पुरातत्व खात्याला ते पाहूया
माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले सांगितले की ,पन्हाळगड संवर्धन झालेच पाहिजे आपण जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत उग्रप्रकारचे आंदोलन येथे उभारूया जसे की, साखळी उपोषण, रस्ता रोको, असे प्रकारे आंदोलन करू सनदशील मार्गाने निधी उपलब्ध करून घेऊन पन्हाळगडाची च्या इमारती पडत आहे .खराब झाले आहे .त्याचे फोटो व्हिडिओ तयार करूया व आपल्या निवेदनाच्या खाली ते फोटो लावूया .सर्व गावातले लोकांनी यात कसल्याही प्रकारचे राजकारण न करता एकत्र लढा देऊया.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी मीटिंगमध्ये म्हणतात की पुढे,जे लोक स्वच्छता मोहीम ला येतात त्यांना परमिशनच देऊ नये स्वतः नगरपरिषद ने स्वच्छता ठेवावी . त्यांना फोटो काढून सोशल मीडियावर जे लोक पसरवतात की ,आम्ही अशी पन्हाळगडाची स्वच्छता केली एवढा दारूच्या बाटल्या गोळा केल्या. स्टंटबाजी करत असतात याला अपवादात्मक काही लोक खास स्वच्छता मोहीम राबवणार आहेत त्यांना नियम घालून द्याव्यात की, तुम्हाला हे फोटो व्हायरल करता येणार नाहीत.तसे पाहता पन्हाळगड आपला शंभर टक्के स्वच्छच आहे.
तसेच पन्हाळगड तडबंदी मोकळी व्हावी यासाठी पण प्रयत्न व्हावे अशी या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली. पुढील दिशा साठी तारीख दिली जाईल. पुन्हा मीटिंग घेतली जाईल.पन्हाळा बचाव समिती तयार केली जाईल. यात वेगवेगळे समित्या तयार केले जाणार आहे .पन्हाळगड बचाव मोहीम ही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे. फोटोग्राफर धीरज कुराडे व बशीर मुक्तवल्ली ऐतिहासिक जुन्या इमारती ज्या ठिकाणी कुमकुत झाले आहेत त्याचे फोटो काढतील असे ठरले,
यावेळी पन्हाळातील सर्व आजी -माजी नगरसेवक, विजय पाटील, रवींद्र धडेल ,मंदार नाईकवडी,अमित पवार, शितल गवंडी, आशिष उदाळे,राजू नगरजी, राजू आगा, ज्येष्ठ पत्रकार,आनंद जगताप ,नितीन भगवान .गडावरील सर्वच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
