दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी -गोविंद पवार
लोहा : नैसर्गिक आपत्ती येते तेंव्हा सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना त्याचा सामना करावा लागतो. मागील आठवडयात संततधार पावसाचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.विष्णुपुरी प्रकल्पाचा येणारा कॅनल,कालवा उमरा शिवारात गट क्रमांक ९८ येथे फुटून शेतकरी पुंडलिक मारुती सिरसाट,भुजंगा माधव सिरसाट,सुभास जगदेराव सिरसाट, भुजंगा दिगांबर सिरसाट,दिलीप रावसाहेब सिरसाट,विनायक भानुदास सिरसाट,अरविंद विश्वांभर सिरसाट,राजेश विठ्ठलराव सिरसाट,बालाजी आनंदा सिरसाट यांच्या शेताजवळील कैनॉल वीस फूट लांब एक साईड फुटल्याने शेतात पाणी घुसून शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.सखल भागात पाणी साचून पिके पाण्याखाली गेल्याने व काहींच्या जमिनी खरडून अनेक शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
