दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी -दत्तात्रय वामनराव कराळे
शासनाने जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला जीएसटीचा पाच टक्के कर रद्द करावा म्हणून आज परभणीतील किराणा व्यापारी मर्चंट असोसिएशन तर्फे आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन दिले.
शासनाने गहू, तांदूळ, डाळ, रवा, मैदा आदी किराणा मालावर पाच टक्के जीएसटीचा अधिभार लावला आहे. त्याचा जबरी फटका सर्वसामान्य नागरिकांना तर बसला जात आहेच शिवाय व्यापारी वर्गालाही त्याची झळ सोसावी लागणार आहे. परिणामी त्याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला जाऊन धंद्यावर सुध्दा विपरित परिणाम बसला जाणार आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज सोळा जुलै २०२२ रोजी परभणी किराणा व्यापारी मर्चंट असोसिएशन द्वारा एक मोर्चा काढून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात त्यांनी लावलेला हा अधिभार रद्द केला जावा अशी मागणी केली आहे.
