दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:-पंढरपूर येथे परतीच्या प्रवासास निघालेल्या शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचे भूम शहर व तालुक्यातील भाविकांनी स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी ओंकार चौक ते साहिल कॉम्प्लेक्स भाविकांनी मोठी गर्दी केली होती.पालखीचे शहरात आगमन होताच माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे, साहिल आप्पा गाढवे,नगर परिषद प्रशासक तानाजी चव्हण,न. प. अभियंता गणेश जगदाळे, पोलीस निरीक्षक भूम दत्तात्रय सुरवसे , सपोनि आंभी आशिष खांडेकर, व्यापारी मंडळ यांच्यासह इतर मान्यवरांनकडून स्वागत करण्यात आले. तेथे वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले.व्यापारी मंडळ कडून छत्रचे वाटप वारकरी यांना करण्यात आले. भूमनगरीत भक्तिमय वातावरण झाले होते. यावेळी भाविक आनंदी होते.छत्रपती शिवाजी नगर,ओंकार चौक ते साहिल कॉम्प्लेक्स भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कुंथगिरी रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली.यावेळी आलंप्रभू शहर विकास आघाडीचे पदाधिकारी,विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठान मित्र परिवार,व्यापारी मंडळ, भूम नगरीत तील नागरिक ,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
