दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- एखाद्याचा हस्ते झेंडा फडकवणे ही त्या व्यक्तीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.परंतु अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा हे गाव सर्वांच्या परिचित असेलच.आता बेलोरा गावाचेच नव्हे तर संपुर्ण अमरावती जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहचले असून आ.बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून गेल्या १० वर्षांपासून “तिरंगा माझा” उपक्रम राबवितात.तसेच त्यांच्या स्वतःच्या घरच्या देव्हाऱ्यात सुद्धा तिरंग्याचे पूजन करतात.आता तीच संकल्पना मोदी सरकारने “हर घर तिरंगा” हा येत्या ११ ते १७ ऑगस्ट पर्यंत ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त संपूर्ण देशात साजरा केला जाणार आहे.
असु दे तुझा हिरवा प्यारा,असु दे तुझा निळा न्यारा,असु दे तुझा भगवा सुनेहरा पण सबसे प्यारा तिरंगा हमारा “जशी मनवतो ईद,दिवाळी यापेक्षाही चांगली करा १५ ऑगस्ट व २६ जानेवारी” असे आपल्या भाषणात आ.बच्चुभाऊ कडू नेहमी म्हणतात.बेलोरा येथे दरवर्षी संपुर्ण गावातील शासकीय कार्यालये,शाळांमद्धे नव्हे तर गावातील प्रत्येक घरांवर तसेच मंदिर,मस्जिद,बुध्दविहार यावर १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला तिरंगा फडकविला जातो.
*आ.बच्चु कडू यांनी पंतप्रधान मोदीजी मानले आभार*
धार्मिक सणासोबत राष्ट्रीय सण राबविणे या संकल्पनेतून मी गेल्या १० वर्षापासुन प्रत्येकवर्षी बेलोरा गावात २६ जानेवारी व १५ ऑगस्टला प्रत्येक घर,कार्यालयवर तिरंगा फडकवून साजरा करतो.एवढेच नव्हे तर मस्जिद,मंदिर,बुध्दविहार यावर “तिरंगा माझा” हा उपक्रम निरंतर राबवित आहो असे आ.बच्चुभाऊ कडू यांनी म्हटले.
आज तीच संकल्पना स्वातंत्र्याचे ७५ व्या वर्षपुर्ति निमीत्त “हर घर तिरंगा” पंतप्रधान मोदीजींनी संपूर्ण भारतात राबवित आहेत.त्याबद्दल मनस्वी खुप गर्व वाटते तसेच ह्यावेळी मोदीजींचे धन्यवाद आ.बच्चूभाऊ कडू मानले.
