
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाचे संविधान लिहिले असून संविधनामुळे देशाचा राज्यकारभार चालतो.संविधनामुळे देश एकसंघ आहे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक पुस्तके, कांदबऱ्या लिहील्या असुन त्यांचे वाचन प्रत्येकांनी करावे असे प्रतिपादन लोहा न.पा.चे गटनेते नगरसेवक करीम भाई शेख यांनी लोहा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना केले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डि.टी.आंबेगावे,नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त लोहा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह लोहा येथे दिनांक 18 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोहा नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक करीम भाई शेख, नगरसेवक नबीभाई शेख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतिश भाऊ आनेराव, रिपब्लिकन सेना मराठवाडा सदस्य अनिल दादा गायकवाड, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा विधानसभा अध्यक्ष विलास सावळे,सामाजिक कार्यकर्ते तथा मातंग समाजाचे नेते बाबुराव टोम्पे आदी मान्यवर प्रमुख अतिथीच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.सर्व प्रमुख मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष मोहन पाटील पवार, तालुका उपाध्यक्ष संजय कहाळेकर, सचिव मारुती पाटील चव्हाण, कोषाध्यक्ष रमेश पाटील पवार, सहकोषाध्यक्ष संतोष तोंडारे, प्रसिद्धी प्रमुख तथा आयोजक शिवराज दाढेल, पत्रकार विनोद महाबळे, सह पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास सावळे यांनी तर आभार तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांनी मानले.