दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
मागील काही दिवसांपासून कोसळणा-या संततधार पावसामुळे जमीनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला असल्याने झाडे लावण्यास पोषक अशा संधीचा फायदा घेत आज मंगळवार, दि. १८ जुलै २२ रोजी सकाळी पूर्णा पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
प्रारंभी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) ओमप्रकाश यादव यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला.
आपले घर, कार्यालये, कंपन्या, कारखाने परिसरात, गल्ल्या, रस्ते आदींसह औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन कायमची हिरवळ निर्माण केली तर त्या हिरवळीमुळे सुशोभिकरण वाढीस लागते, सावलीही मिळते शिवाय निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी मोठी मदत मिळून पाऊसही ब-यापैकी पडला जाईल अशी शक्यता असते किंबहुना त्यासाठीच “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या पंक्तीला अनुसरून बदललेल्या वातावरणाचा गुरे, ढोरे, पशु, पक्षी यांना सुध्दा त्याचा लाभ होऊ शकतो, हे मुळीच विसरुन चालणार नाही या प्रकारचे महत्व विषद करुन वृक्षारोपण किती आवश्यक आहे हे यावेळी पटवून देण्यात आले.
सदर वृक्षारोपण समयी जे मान्यवर उपस्थित होते त्यात प्रामुख्याने पूर्णा पं.स. घ्या गटविकास अधिकारी सुनीता वानखेडे, विस्तार अधिकारी तुकाराम पोटे, संबंधित गावचे ग्रामविकास अधिकारी केशव भुसारे व त्यांचे सहकारी केशव जवंजांळ, अशोक खुपसे, प्रभाकर दुधाटे, प्रकाश दुधाटे, मुकुंद खर्डे, विशाल अंबुरे, संबंधित गावचे सरपंच, चेअरमन, उपसरपंच, वृक्षप्रेमी व ग्रामस्थ या सर्वांचा समावेश होता. या सर्वांचे सहकार्य सदर उपक्रमास लाभले गेले. ज्यामुळे सर्वत्र आनंदमय वातावरण झाले.
