
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी -गोविंद पवार
आज शिव छत्रपती माघ्यामिक विद्यालय , लोहा येथे लोहा बाजार समिती (मार्केट कमिटी)चे पहिले सभापती कै.शंकरराव मारोतराव कहाळेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्य त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोहा/कंधारचे मा.आमदार रोहीदासजी चव्हाण साहेब यांनी कै.शंकरराव मारोतराव कहाळेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला ,कै.शंकरराव कहाळेकर यांचे जेष्ठ चिरंजीव तथा व्यापारी शेषेराव कहाळेकर, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भारत पाटील पवार, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच.जी.पवार सर विलास कहाळेकर , दिलीप कहाळेकर ,बालाजी गवाले, हरिहर धुतमल , राहुल पारेकर ,पवार ए.ई.,सौ.आढाव मॕडम,सौ.कळकेकर मॕडम,गजानन जाधव,एस.आर.शेटे,वडजे व्ही.डी.आदीची उपस्थित होती.यावेळी नाट्य कलावंत, ज्येष्ठ साहित्यिक शेषेरावजी कहाळेकर यांनी शिव छञपती प्राथमिक व माध्यमिक शाळा लोहा,जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा पांगरी,जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा,लोहा,आश्रम शाळा माळाकोळी,डाॕ.याकुबखान प्राथमिक शाळा लोहा,श्री संत गाडगे महाराज वि.लोहा अशा अनेक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन जेवणाच्या कार्यक्रमावर मोठा खर्च न ठेवता खरोखरच गरीब विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे खुपच मदत झालेली दिसुन येते.यापुढे समाजाने मोठमोठया तेरवी कार्यक्रमावर,कीर्तनावर ,लग्नाच्या मोठमोठया दिखाव्यावर खर्च मर्यादित करुन गावातील शाळा सुधारावी,गावातील वाचनालय समृद्ध करुन समाजासमोर आदर्श निर्माण करावा,शालेय जीवनात विद्यार्थ्यानी मोबाईलचा मर्यादित वापर असा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रोहिदासजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सुंदर संचलन रमेश पिठ्ठलवाड सरांनी केले तर आभार पवार सरानी मानुन राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास
विद्यार्थ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती