
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूजा आयकर विभागात भारतातील सर्वात लहान चिफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफिसर
बारावीचा विद्यार्थी प्रणव टाळके याची महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ लॉ मध्ये CLAT या CET माध्यमातून निवड
भूम:-शंकरराव पाटील महाविद्यालयात गुणवंतांचा तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या रामलिंग येथिल स्वच्छता अभियानाच्या विशेष कार्यासाठी यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.चंदनशिव होते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.डी.व्ही.शिंदे, प्रा.टी.आर.बोराडे, डॉ.एन.डी.पडवळ, प्रा.टाळके के.यु. यांची विशेष उपस्थिती होती. बी.कॉम.तृतीय वर्षाची विद्यार्थीनी पुजा चव्हाणचे आयकर विभागात भारतातील सर्वात लहान चिफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफिसर (CISO) म्हणून निवड झाली आणि इयत्ता बारावीचा विद्यार्थी प्रणव टाळके याची महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ लॉ मध्ये CLAT या CET माध्यमातून भारतातुन १४४७ व्या रॅंक वर निवड झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजश्री तावरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.जी.एस.खंदारे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी डॉ.अनुराधा जगदाळे, प्रा.पुनम सुतार, प्रा.जी.सी.काळे, प्रा.टी.एल.घुले, प्रा.एन.आर.जगदाळे, प्रा.जी.एम.इनामदार, प्रा.एस.ए.पाटील, प्रा.एस.डी. बोराडे, प्रा.दत्तात्रय साठे , प्रा. गोकुळ सुरवसे , प्रा.साळुंके , प्रा.पठाण, प्रा.गोपाळघरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.