
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अरुण भोई
दौंड : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय लागला मार्ग आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज दौंड तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी जाहीर केली. दौंड नवीन प्रशासकीय कार्यालयात ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.आरक्षण सोडत कशाप्रकारे काढली जाईल याची माहिती पाटील यांनी उपस्थित नागरिकांना दिली. प्रथम अनुसूचित जाती, ओबीसी व नंतर सर्वसाधारण जागेचे आरक्षण सोडत ही लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने हे आरक्षण सोडत काढण्यात आले.
अनुसूचित जाती- २ जागा, ओबीसी ( नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग) – ४- महिला – ५ जागा, खुला प्रवर्ग (ओपन) – १० जागा आहे. गुणांनुसार जाहीर करण्यात आलेले आरक्षण सोडत पुढील प्रमाणे १) खामगाव – सर्वसाधारण २) राहू – सर्वसाधारण ३)पिंपळगाव – सर्वसाधारण (महिला) ४) पारगाव – अनुसूचित जाती – (महिला ) ५) कानगाव सर्वसाधारण- (महिला) ६) गोपाळवाडी – ओबीसी (महिला)
लिंगाळी – सर्वसाधारण ८) देऊळगाव राजे – सर्वसाधारण ९) राजेगाव – ओबीसी ( पुरुष ) १०) खडकी ओबीसी (महिला) ११) पाटस सर्वसाधारण १२) कुरकुंभ:-. सर्वसाधारण (महिला) १३) वरवंड – सर्वसाधारण (महिला) १४) बोरीपार्धी :-. सर्वसाधारण (महिला) १५) यवत ओबीसी (पुरुष) १६) बोरीभडक :- अनुसूचित जाती ( पुरुष )
तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंखे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे आदी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आदी यावेळी उपस्थित होते.