
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- सलमान नसीम अत्तार.
धाड सर्कल
धाड दि.29 करडी येथील करडी संग्राहक तलावाच्या पाण्यात आत्महत्या केलेल्या सौ.सरितासह दोन्ही मुलांचे मृतदेह आपत्ती व्यवस्थापनाचे अथक परिश्रमाने सापडले आहे.
करडी येथील सौ. सरिता ज्ञानेश्वर पैठणे या विवाहीत महीलेने आपल्या दोन मुलांसह करडी संग्राहक तलावाच्या पाण्यात आत्महत्या केल्याची घटना दि.28 रोजी उघडकीस आली होती. मात्र मुलांचे मृतदेह आढळून आले नव्हते. आज दी.29 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुलगी कु. वैदिकाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला.तर मुलगा वंश याचा मृतदेह दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधण्यात यश मिळविले.
धाड पोलिसांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणी साठी धाड ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला.
दरम्यान दुपारी साडे अकराच्या सुमारास मुलांचा शोध घेण्यासाठी आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाचे पथकाने आपले शोधकार्य सरु केले. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर मुलाचा मृतदेह मिळविण्यात यश प्राप्त झाले.
याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ शरद कौतिकराव दामोदर रा.फर्दापुर ता.सोयगाव जिल्हा औरंगाबाद यांनी धाड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे की बहीण सरिताला पती ज्ञानेश्वर सह सासु कासाबाई विश्वनाथ पैठणे, तसेच नणंद शिला पगारे ह माझी बहिन सरिताला चारित्र्यावर संशय घेवून मारहाण व त्रास देत होते. मृत्यु पूर्वी बहिन सरिताने दि. 27 रोजी रात्री गुड्बाय, आम्ही जग सोडून जात आहे. अशा आशयाचा व्हाट्सअप मेसेज पाठविला होता. तसेच माझ्या कपाटातील रजिस्टर पोलीस काकांच्या स्वाधीन करा म्हणून सांगीतल होत. आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासह ईतर महत्वाच्या गोष्टी या संदर्भात अनेक बाबिंचा खुलासा रजिस्टर मध्ये केला आहे. मि दि. 28 रोजी धाड करडी येथे सरिताचा शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही. यावरून धाड पोलिसांनी कलम 306,498अ,34भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करून पती ज्ञानेश्वर विश्वनाथ पैठणे यास अटक केली आहे. तर सासु व नणंद फरार झाले आहे.
तपास ठानेदार अनिल पाटील, पोलीस अंमलदार राजु माळी करीत आहे.