
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- मानिक सुर्यवंशी
चैनपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री मारोतीराव हणेगाव यांचा वाढदिवस काल संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने ग्रामदैवत भीमाशंकर मंदिर ची सामूहिक आरती करून ग्रामपंचायत च्या पटांगणामध्ये वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला मारोतीराव हानेगाव हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान असून गेली अनेक वर्ष ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. गावातील व परिसरातील अनेक गोरगरिबांच्या अडचणीमध्ये ते नेहमीच धावून जात असून गावातील स्मशानभूमी, आरोग्य उपकेंद्र, शैक्षणिक सुविधा, पाणीपुरवठा, अतिक्रमण व निराधार महिला व अपंग यांच्या बाबतीमध्ये वरिष्ठाकडे ते पाठपुरावा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न करत असतात.त्यांना वाढदिवसानिमित्त जिल्हा पातळीवरील व तालुका पातळीवरील सर्व कार्यकर्ते व गावातील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती, गावातील प्रमुख समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा,व गोरगरीब महिलांचा त्यांना वाढता पाठिंबा असून त्यांनी अल्पावधीतच सर्वांची मन जिंकलेली आहेत. मारोतीराव हे अत्यंत उच्च विद्या विभूषित राज्यशास्त्रात ते पदवित्तृर असून,त्यांची प्रशासनावर चांगली पकड मजबुत आहे. सर्व महापुरुषांचा विचारांचा वारसा ते धाडसीपणाने चालवत असतात.महापुरुषांच्या विचारावर चालणारे सर्व महामानवांना मानणारे अशी त्यांची विचारशैली असून.गावातील उभरते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते हे विशेष सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम त्यांनी गावांमध्ये राबविलेले आहेत त्यांच्या या उपक्रमशील वृत्तीमुळेच सर्व समाजातील लोकांचा त्यांना वाढता पाठिंबा आहे हे विशेष व त्यांनी कोणत्याही आमिषाला दबावाला बळी पडणारे कार्यकर्ते नसून अत्यंत धाडसीपणाने कोणतेही कार्य पूर्णत्वाकडे नेत असतात. म्हणून त्यांचा हा वाढदिवस गावातील त्यांच्या हितचिंतकांनी व मित्रपरिवाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पाडण्यात आला त्याबद्दल त्यांनी सर्व गावकऱ्यांचे परिसरातील प्रमुख व्यक्ती खानापूर सर्कलचे नेते श्री अनंतराव पाटील ,बसवराज पाटील वनाळीकर जि.प.स्वि.सदस्य,श्री अटकळे गुरुजी, ताडकोले साहेब, बालाजी शेळके, संजय गवलवाड, व परिसरातील हनुमान हिप्परगा,सुंटगी,अंतापूर ,हावरगा,मुजळगाव, येथील असंख्य कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते त्यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.व वाढदिवसानिमित्त यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत संघर्ष करणार हा संकल्प त्यांनी सर्व गावकऱ्याच्या साक्षीने केला.