
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – प्रदिप मडावी
वरोरा
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या वायगांव भोयर येथे आज शनिवारी दुपारी अंदाजे 3.30 वाजताच्या दरम्यान शेतात वीज पडून चार महिला मृत्यू पावल्याची दुदैवी घटना घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उपरोक्त घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलांचे नांव अनुक्रमे
हिरावती शालीक झाडे (वय40 वर्षे)पार्वता रमेश झाडे (वय 65 वर्षे)मधुमती सुरेश झाडे (वय 20 वर्षे)रीना नामदेव गजभे (वय 20 वर्षे) असल्याचे समजते.दरम्यान घटनेची माहिती होताच महसूल विभागाचे वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे तसेच नायब तहसीलदार मधूकर काळे घटनास्थळा कडे रवाना झाल्याचे कळते.या घटनेमुळे संपूर्ण वरोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.