
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
धुळे – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज धुळ्यात सभा घेतली.
यावेळी पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं स्पष्ट मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यानंतर राष्ट्रवादीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नुकताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारकडे केली आहे. त्यातच शरद पवार यांनी धुळ्यातील सभेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
एक काळ असा होता की इंग्रजांचं संपूर्ण जगावर राज्य होत अशात इंग्रजांचा सूर्य कधीच मावळत नाही असं बोललं जायचं परंतु महात्मा गांधींनी सर्वांना एकत्र केलं आणि इंग्रजांपासून देशाला स्वातंत्र्य मिळाल. तसेच इंग्रजांचा पराभव इथला माणूस करू शकतो हा ज्या देशाचा इतिहासाचा आहे आज त्या देशात सत्तेचा गैर वापर करून दमदाटीच वातावरण कोणी करत असेल तर त्यांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद इथल्या सामान्य माणसात आहे असं देखील पवारांनी यावेळी ठणकावून सांगितलं.