
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर मावळ तालुक्यातील शिवसेनेत संघर्ष निर्माण झालाय. उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिन्द्र खराडेंनी मावळ लोकप्रतिनिधी आणि त्याचे कार्यकर्ते यांना उद्देशून एक भला मोठा मेसेज व्हाट्सअँप ग्रुपवर टाकला होता. त्यात गद्दार आणि अन्य शब्दाचा वापर केला होता. हा मजकुर कट्टर शिवसैनिकांच्या व्हाट्सअँप ग्रुपवर एकनाथ शिंदे गटाला उद्देशून टाकलेला होता. हा मेसेज टाकणे मच्छिंद्र खराडेंना भोवला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सीआरपीसी १४९ प्रमाणे खराडेंना नोटीस धाडली आहे.
शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सहभागी झालेत. त्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचा समावेश होता. त्यानंतर बारणे व त्यांच्या कार्यकर्त्यांना गद्दार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा आक्षेपार्ह मेसेज मच्छिंद्र खराडे यांनी शिवसैनिकांच्या गृपवर टाकला. त्यामुळे सर्वसर्वत्र वातावरण तंग झाले होते. पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले होते.