
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामजिक कार्यकर्ते गणेश बाबर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत आधारकार्ड आणि पॅन कार्ड शिबिराचे उद्घाटन केले. आळंदी रोडवरील सिग्नेट हाऊस येथे ३० जुलै ते १ ऑगष्ट २०२२ पर्यंत सकाळी १० ते ५ या वेळेत शिबीर सुरु असून या शिबिरात आधार आणि पॅनकार्ड संबंधित सर्व कामे करून मिळनार आहेत.
या चांगल्या उपक्रमासाठी गणेश बाबर यांचे अभिनंदन केले.
यावेळी भा. ज. पा. शहर अध्यक्ष मा. जगदीश मुळीक यांच्या सह मंगेश गोळे, भगवान जाधव, चंद्रकांत जंजिरे, गणेश बाबर, शशिकांत कुलकर्णी, राजू बाफना, विजय चौगुले, राहूल जाधव, सुभाष चव्हाण, राजू केसरकर, भाग्यश्री मंथळकर, शामा जाधव, अजहर खान, जेबा शेख, नितीन बर्गे, ज्ञानेश्वर बाबर , किसन बाबर, विशाल भोसले, निलेश भोसले, प्रीती भट्टी, राजेश लोकरे, सागर कांबळे, गुणवंत चव्हान, संदिप केदारी यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते.