
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
राजूरा
९ ऑगस्ट ला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी असे निवेदन मा. तहसीलदार,राजुरा यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मूर्मु यांना पाठविण्यात आले. संपूर्ण जगात,जगाच्या प्रत्येक देशात कमी – जास्त प्रमाणात आदिवासी उपलब्ध आहेत. आदिवासी जमात ही जगातील मूळ निवासी आहे. आदिवासींची बोली भाषा,राहणीमान,संस्कृती,वेशभूषा हे इतरांपेक्षा भिन्न आहेत.
आदिवासी हे निसर्ग पूजक आहेत,आणि निसर्ग रक्षक सुद्धा आहेत.पण आदिवासींची संख्या कालांतराने कमी होत चालली आहे. या गोष्टीची दाखल घेत UNO (युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन) ने ९ ऑगस्ट १९९४ ला, ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर केले.
जागतिक आदिवासी दिवस जाहीर करण्यामागील हेतू म्हणजे, जगात अस्तित्वात असलेली आदिवासी यांच्या भाषा,बोली,राहणी,संख्या, संस्कृती यांचे संवर्धन तथा रक्षण करणे.
भारतात, भारताच्या संपूर्ण लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी ची संख्या ही ८% आहे, आणि ते भारताच्या प्रत्येक जिल्हा, तालुका ,गाव , पाडा मध्ये कमी – जास्त प्रमाणात वास्तव्य करतात. या जगाचा मूळ निवासी असूनसुद्धा आतपण आदिवासी शिक्षणी, आर्थिक व सामाजिक बाजूने मागासवर्गीय मध्ये मोडतात.
आदिवासी समाजात अनेक क्रांतीवीर सुद्धा झाले आहेत. १८५७ च्या स्वातंत्रसमर च्या अगोदर पासून ते १९४७ च्या भारत स्वतंत्र संग्राम मध्ये आदिवासी नी हिरहिरणे भाग घेतला आहे, मग ते असहकार चळवड असो, सविनय कायदेभंग असो, किंवा भारत चोडो आंदोलन असो प्रत्येक चळवडीत आदिवासी समाजाने भाग घेलेला आहे. १८५७ अगोदर राघोजी भांगरे असो,१८५७ नंतर चे टंट्या भिल्ल, बिरसा मुंडा असो,किंवा भारताच्या घटना समिती बसणारे ICS जयपाल सिंह मुंडा असो आदिवासी प्रत्येक वेळेस उपस्थित होता.
आदिवासी समाज निसर्गाचे पूजक, निसर्ग रक्षक म्हणून, आणि स्वतंत्र लढ्यात भाग घेऊन स्वातंत्रवीर म्हणून सुद्धा समोर आलेले आहेत, तरी सुद्धा आदिवासी समाजाकरीता राष्ट्रीय स्तरावर एकही सार्वजनिक सुट्टी नाही. आदिवासी समाजाचे व संस्कृती चे रक्षण करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. या करिता बिरसा क्रांती दल ने राष्ट्रपती निवेदन दिले आहे, जेणेकरून त्या सार्वजनिक सुट्टी च्या दिवशी संपूर्ण भारतातील आदिवासी समाज एकत्र येणार, संस्कृतीची जोपासना करणार. निवेदन देताना संतोष कुडमेथे ,अभिलाष परचाके ,आकाश गेडाम, प्रमोद कुंभरे ,सुशील मडावी, सदानंद मडावी,गणेश मडावी, अरुण कुमरे,सोबतच अनेक आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.