
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दिनांक १८ रोजी रात्री 11 वाजता सिरे सायगाव येथील एक महिलेला प्रसूती साठी दाखल करण्यात आले होते. सदरील महिलेला उपस्थित महिला डॉक्टरांनी तपासले असता त्यानी बाळ कुपोषित आहे बाळाचे वजन कमी आहे तुमच्या पत्नी ला औरंगाबाद ला खाजगी दवाखान्यात घेऊन जा असा सल्ला दिला त्या महिलेचे पती देखील घाबरले त्यानीं गंगापूर शहरातील एका खाजगी दवाखान्यात महिलेला दाखल केले असता पहाटे ४ वाजता नॉर्मल डिलेव्हरी झाली बाळ देखील सुखरूप होते मात्र डॉक्टरांच्या सल्याने महिला व त्याचे पती घाबरून गेले होते एकीकडे शासन सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देतंय आणि अधिकाऱ्यानी असं वागल्यास सर्वसामान्यांचा विश्वास हा न्याय व्यवस्थेवरून उठून जाईल यामुळे डॉ आबासाहेब सिरसाठ यांनी जिल्हा शल्य चिकिस्तक यांच्या कडे तक्रार केली असता त्यानी संबंधित डॉक्टर वर पगार वाढ थांबवण्याची कारवाई केली या निर्णयाचे डॉ आबासाहेब सिरसाठ यांनी स्वागत केले जेणे करून सर्वसामान्य जनतेचा विश्वास मजबूत होईल.