
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट माहूर तालुक्यामध्ये अतिदृष्टीचे व ढगफुढी सदश्य पाऊस झाल्याने किनवट माहूर तालुक्यातील शेतीसह पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अश या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री व तसेच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व माजी उपमुख्यमंत्री तसेच माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार धनंजय मुंडे बीड यांनी आज किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील मौजे दत्तमांजरी व झरा मांडवा,कुपटी या गावातील शेतीबांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्येकानीं पाहणी केली वअजित पवार यांनी मौजे दत्तमांजरी येथील शेतकरी लक्ष्मण देवा आर के. व जनार्धन दगडू केंद्रे या शेतकऱ्याची प्रत्येक संवाद साधला. यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना माहिती दिली,तर राष्ट्रवादी काँग्रेसचे किनवट माहूर विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने यांनी अतिदृष्टीने शेतकरी हैराण असताना त्यातच वन्यप्राणी कोवळी पिके फस्त करून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याबाबतअजित दादा पवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी विषयी पोटतिडके कैफियत मांडली. या दौऱ्यादरम्यान माजी सामाजिक न्यायमंत्री माजआमदार धनंजय मुंडे माजी आमदार प्रदीप नाईक,माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव,नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मेघराज जाधव, युवक तालुका अध्यक्ष मारोती रेकुलवार,राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष नम्रता कीर्तने,राष्ट्रवादी किनवट तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य, बंडूसिंग नाईक,विशाल जाधव,मधुकरबाबा राठोड,जहीरोद्दीन खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.या दौर्रातुन राज्य सरकारने तातडीने संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीची हेक्टरी पन्नास हजार सरसकट मदतीची घोषणा करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.येत्या आगामी पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते यांनी सभागृह बंद पाडुन शेतकरी वर्गानां न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.