
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
श्री संत शंकरस्वामी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता , एक लाख भाविकांची उपस्थिती,
श्री संत शंकरस्वामी महाराज वैराग्याचे महापुरुष होते स्वामी बद्दल निष्ठा ठेवल्यास श्रद्धेचे फळ निश्चित मिळते अंतकरणाचा मनोरथ पूर्ण करण्यासाठी संतसेवा करा, संतसंगतीने जीवनाची कृतार्थता होते परिपूर्ण अवस्था प्राप्त होण्यासाठी संतांचे विचार आचरणात आणावे असे प्रतिपादन श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थांनचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे यांनी केले.
श्री संत शंकरस्वामी संस्थान फडाचा २७७ वा अखंड हरीनाम सप्ताह शिऊर येथे २ ते ९ ऑगस्ट दरम्यान संपन्न झाला , सप्ताहाच्या सांगतेवेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. “तुझी संगती झाली माझी निश्चिती” या संत तुकाराम महाराज यांच्या रचनेवर त्यांनी विवेचन केले
पुढे बोलताना ते म्हणाले की, श्री संत शंकर स्वामींचा अधिकार राज्यातील संत परंपरेमध्ये मोठा असून स्वामी चरण दर्शना मुळे मिळणारी ऊर्जा पावन करणारी आहे मराठवाड्यातून सर्वात पहिले दिंडीची सुरुवात शंकरस्वामी महाराजांनी केली आध्यात्मिक क्रांती घडवण्यासाठी तसेच सर्व समाजातील बांधव एकत्र येऊन संतविचाराचा प्रचार व प्रसारासाठी अखंड हरिनाम सप्ताह महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले प्रेम, विचार,आचार एकत्र आल्यास वारकरी संप्रदायात महापुरुष निर्माण होतो.
संत चमत्कार करत नसतात मात्र समाजाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांना चमत्कार करावे लागतात असेही ते म्हणाले वारकरी परंपरेमध्ये जातीधर्माला थारा नसतो सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संतांनी कार्य केले असे भोपळे महाराजांनी किर्तनात सांगितले
तब्बल ६४ ट्रॅक्टर मधून महाप्रसाचे वितरण
श्री संत शंकरस्वामी महाराज सप्ताहाच्या सांगतेवेळी तब्बल ६४ ट्रॅक्टरमधून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवसापासून आपले ट्रॅक्टर सेवेत दिले होते
राष्ट्रगीताने कीर्तनाला सुरुवात
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रीय ध्वज उंचावत राष्ट्रगीत गायन केले.
शिस्तीचे व एकोप्याचे दर्शन
या अखंड हरीनाम सप्ताह कालावधीत शिऊर येथील स्वयंसेवक यांनी शिस्तीचे दर्शन घडविले तर ग्रामस्थांनी हेवेदावे बाजूला ठेऊन जातीयतेला मूठमाती देत एकोप्याचे दर्शन घडविले, सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून या सप्ताहाने लौकिक मिळविला. सप्ताह यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी पुढाकार व परिश्रम घेतले.
शाळा महाविद्यालयाचा सहभाग
या अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगते प्रसंगी महाप्रसाद वितरणा साठी शिऊर गावातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत महाप्रसादाचे वितरण केले प्रा.कैलास जाधव यांनी विशेष योगदान दिले.
किर्तन महाप्रसादावेळी पावसाची उघडीप
अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाल्यापासून पावसाने दररोज हजेरी लावली होती मात्र काल्याच्या किर्तन, व महाप्रसाद वितरण होईपर्यंत पावसाने उसंत घेतली.
सप्ताहवेळी मान्यवरांची उपस्थिती
कोरोनाच्या कालावधीनंतर व्यापक प्रमाणात सप्ताह पार पडला या सांगतेप्रसंगी अंदाजे एक लाख भाविकांची उपस्थिती होती सोळा एकर विस्तीर्ण परिसरात हा सोहळा पार पडला सांगतेप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती सप्ताह यशस्वितेसाठी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांच्यासह विश्वस्त,सप्ताह समितीचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.