
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : नितीश कुमार यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले की, काही लोकांना वाटते की विरोधी पक्ष संपेल. आम्ही विरोधातही आलो आहोत. नितीश कुमार यांच्या या विधानाला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विधानाशी जोडले जात आहे, ज्यात त्यांनी देशात प्रादेशिक पक्ष संपत असल्याचे म्हटले होते. सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि फक्त भाजपा टिकेल असे मत नड्डा यांनी व्यक्त केले होते. त्याला प्रत्युत्तर देत नितीश कुमार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमचे सरकार बनले, शपथही घेतली आणि आता आम्ही विरोधकांसोबत आलो, असेही ते म्हणाले.
देशभर फिरून विरोधकांना बळ देण्याच्या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले की, आम्ही पुढे सर्व काही करू, संपूर्ण विरोधकांनी एकजुटीने पुढे जावे अशी आमची इच्छा आहे आणि योजना तयार आहे. विरोधी पक्ष मजबूत होईल. नितीश कुमार विरोधकांना बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासोबतच 2024 च्या निवडणुकीत भाजपला पर्याय म्हणून देशातील विरोध पक्ष एकत्र करण्यावर भर देतील.