
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर (प्रतिनिधी)आज दि.10/08/2022 रोजी विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. स्वहस्ते विद्यार्थ्यांनी राख्या बनवून आणल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे महत्त्व बेजगमवार सविता यांनी सांगितले.यात श्रावणी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतो. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी रुपी पवित्र धागा भावाच्या मनगटावर बांधती भावाचा उत्कर्ष व्हावा ,भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरुपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारणे .राखी बंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम ,परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे ही त्या मागची भावना आहे.राखी पौर्णिमेची सुरुवात कशाप्रकारे झाली या संदर्भात इंद्रदेव इंद्रायणी, श्रीकृष्ण द्रोपदी, राजा हुमायू व चित्तोडच्या राजाची विधवाराणी कर्णावती तसेच अलेक्झांडर आणि राजा बोरस यांच्या विविध कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या.
त्याचबरोबर स्वावलंबनाचे महत्त्व सांगण्यात आले. स्वहस्ते राखी बनवणे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना हा धडा शिकवण्यात आला. स्वतःच्या हाताने एखादे कार्य केल्याने कशाप्रकारे आनंद भेटतो आणि आपल्याला ते कार्य करता येते याविषयीचा मनामध्ये उत्साह आनंद निर्माण होतो हे या उपक्रमातून मुलांनी शिकले. त्याचबरोबर साने गुरुजी यांच्या जीवनातील स्वावलंबनाची शिकवण देणारा एक प्रसंग बाईंनी मुलांना सांगितला. यात दुसऱ्यांपेक्षा आपल्याला अधिक काही येते म्हणून या गर्वाने कोणाला हिणवू नये, तुच्छ लेखू नये. तसेच एकमेकांच्या सहकार्यातून स्वतः ते कार्य शिकावे व आपणही स्वावलंबी बनू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये आणि समोरच्या व्यक्तीमध्ये निर्माण करावा असं स्वावलंबनाचा धडा बाईंनी त्यांच्या कथेतून सांगितला.
यानंतर सर्व शिक्षक बांधवांना व विद्यार्थी बंधूंना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला सर्वांच्या मनगटावरती राखी रुपी पवित्र धागा बांधून सणाचे महत्त्व समजून घेऊन. रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर, शालेय समिती अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर व सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून सहकार्य केले