
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेड तालुका यांच्या वतीने आज 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी दुपारी 12 वाजता ‘सूत्रबंधन’ उपक्रम खेड एसटी आगार येथे यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी एसटी आगारातील अधिकारी, कर्मचारी यांना सदभावनेची स्नेहपूर्वक सूत्र अर्थात राखी बांधली. यावेळी ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री. श्रीकांत चाळके, तालुका अध्यक्ष लक्ष्मण आखाडे, कोषध्यक्ष सचिन मोरे, सहकोषध्यक्ष अजित तटकरे आणि सदस्य विमलकुमार जैन यांच्यासह खेड एसटी आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. रवींद्र वाणकुंद्रे, वरिष्ठ लिपिक (प्रशासन )श्री. जगदीश खानविलकर, वरिष्ठ लिपिक (प्रशासन )विश्वनाथ पिंपळे, लेखापाल श्री. अजय डोंगरे आणि मुख्य कारागीर श्री. गुडेकर तसेच आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ग्राहक पंचायतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एसटी अधिकारी व कर्मचारी यांना परस्पर सहकार्याचा धागा बांधला. यावेळी एसटी अधिकारी वाणकुंद्रे यांनी ग्राहक पंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ग्राहक पंचायतीने अशा प्रकारचे उपक्रम राबवून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे एसटीचे अधिकारी व कर्मचारी आणि ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते यांचा परिचय झाला आणि त्यांच्यात स्नेह भाव अधिक वृद्धिंगत झाल्याचे सांगितले.
तर कोकण प्रांताचे श्रीकांत चाळके यांनी यापुढेही असाच स्नेहभाव कायम राहण्याच्या दृष्टीने ग्राहक कार्यकर्ते सदैव सहकार्याची भूमिका बजावतील असे स्पष्ट केले. हे प्रेम आणि हा स्नेह असाच वृद्धिंगत होईल अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.