
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त भारत सरकारच्या आदेशानुसार हर घर तिरंगा मोहीम हा कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून यांचाच एक भाग म्हणून लोहा शहरात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्षम स्वप्निल दमकोंडवार यांनी लोहा येथे विद्यार्थ्यांना मोफत ५० झेंडे वाटप केले.
लोहि येथील सह्याद्री शैक्षणिक संकुलात दि.१५ आॅगस्ट रोजी आयोजित भारतीय स्वातंत्र्य आमॄतमोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमात शाळेतील इयता तिसरी या वर्गातील विद्यार्थी सक्षम स्वप्निल दमकोंडावार यांने पन्नास भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे ( तिरंगाचे ) वाटप केले.
त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक शाळेच्या संचालिका सौ जयश्री शिंदे सह्याद्री इंग्लिश स्कूलचे मु.अ नागेश हिरास सह्याद्री प्रा. ते उ.मा.वि.पारडीचे मु.अ सुप्रिया वाडेवाले यांनी केले. सक्षम स्वप्नील दमकोंडवार हे लोहा नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप दमकोंडवार यांचे पुतणे आहेत.