
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी जालना परतुर –
मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लालबहादूर शास्त्री विद्यालय व महाविद्यालयातील, अनेक शाळा इतर भानगडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेम अटी व शर्ती घालून दिलेले पत्र्याचा अवमान,बोगस नोकर भरती अनेक शिक्षक शाळेवर काम न करता निवृत्त सुद्धा झाले, याचे उत्तम उदाहरण : भगवान आप्पासाहेब आकात हि व्यक्ती उस्वद-आष्टी या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी केली का ? याची सखोल चौकशी व्हायला हवी, सरकारी पगार घेऊन खाजगी काम करणारे कर्मचारी यांच्याकडून पूर्ण पगार वसूल झाला पाहिजे,काही कर्मचारी पगार शासनाचा घेऊन काम खाजगी करतात, या घोटाळ्या बाबत मा.विभागीय आयुक्त यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली निवेदनात पुढे म्हटले आहे,लालबहादूर शास्त्री विद्यालय महाविद्यालयात संस्थेत नोकरी करणारे कर्मचारी संस्थेचे संबंधित आकात कुटुंबीय व सचिव श्री कपिल बाबासाहेब आकात यांच्या फार्म हाऊस,घर काम, घराला सुरक्षा वाचमेन,गाड्यावर ड्रायव्हर म्हणून काम करतात हे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात विद्यालयातील महाविद्यालयातील कर्मचारी अध्यक्ष सचिव यांच्या जय भवानी निवासस्थानाच्या परिसरातील CCTV जयभवानी निवास या बंगल्यावर कोण कर्मचारी काम करतात त्याचे CCTV फुटेज बघून कारवाई करणे सोपे जाईल, तसेच हे कर्मचारी आपले कर्तव्य बजवतानी कर्मचारी संस्थेच्या व्यतिरिक्त संस्थेच्या अध्यक्ष सचिव श्री कपिल आकात यांचे खाजगी काम करतात म्हणून या श्री.शाहाणे.श्री.जावळे.श्री.पास्टे.श्री.डाकुरकर.श्री.अडगळ. श्री.शेजूळ.श्री.तारे यांच्यासह अनेक कर्मचारी खाजगी काम करीत असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून कारवाई झाली पाहिजे तर मराठवाड्यातील शिक्षण संस्था चालक असे प्रकारे शासकीय पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्याकडून खाजगी काम करून घेणार नाहीत तसेच हा विषय गंभीर आहे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी योग्य ती कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सोळंके यांनी दिला आहे…