
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
लोहा – संत गाडगेमहाराज मा.व उच्च मा विद्यालय, येथे मराठवाडा शिक्षक संघाची लोहा तालुक्यातील शिक्षकांची बैठक मुख्याद्यापक मा.बोधगिरे दिलिपराव सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय अध्यक्ष -मा.सुर्यकांत विश्वासराव , जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव चिलवरवार सर,केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री जी.पी.कौसल्ये सर , स्वा.मुक्टा संघटनेचे तथा सिनेट सदस्य श्री प्रा.सुर्यकांत जोगदंड सर जिल्हा कोषाध्यक्षः श्री आर.डी.पाटील सर, मुख्याद्यापक श्री ई.डी.वडजे सर, मुख्याद्यापक श्री हिंगमीरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
लोहा तालुका कार्यकारणी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांच्या संमत्तीने खालील प्रमाणे निवड करण्यात आली.
**तालुकाध्यक्षः **
श्री रमेश श्रीराम क-हाळे(संजय गांधी हा.कलंबर)
*तालुका सचिव**
श्री जी.एम.सुर्यवंशी (संत गाडगेमहाराज वि.लोहा)
**तालुका कार्याध्यक्ष**
श्री व्ही.आर.लुंगारे (महेश विद्यालय शेवडी)
**ता. उपाध्यक्ष **
श्री दिलीप कहाळेकर(शिवछञपती हा.लोहा)
श्री जी.आर.ताटे(नळगे विद्यालय लोहा)
**सहसचिव**
दत्ताञय श्रावण कांबळे (संत गाडगेबाबा वि.कलंबर)
**कोषाध्यक्ष**
श्री एस.एस.जाधव (शिवाजी विद्यालय सोनखेड)यांची निवड करण्यात आली.
यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष तथा उमेदवार सुर्यकांत विश्वासराव सर,जिल्हाध्यक्ष व्ही.आर.चिलवरवार सर, प्रा.सुर्यकांत जोगदंड सर मुख्याद्यापक बोधगिरे सर यांनी नवनियुक्त सर्व पदाधिका-यांना शुभेच्छा देऊन संघटना बळकट करण्याचे आव्हान केले.
यावेळी संघटनेचे नूतन पदाधिका-यांनी संघटना मजबूत करून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.याप्रसंगी तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.