
दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी-
गोसावी युवा मंचच्या वतीने राज्यस्तरीय गौरव कर्तुत्वाचा 2022 चा पुरस्कार गोविंद भगवानराव गिरी यांना मा.खा.श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते त्रीसुत्री महाअधिवेशनात नुकताच प्रदान करण्यात आला.
लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात गोसावी समाज युवा मंचच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्रीसुत्री महाअधिवेशन घेण्यात आले होते.
गोविंद गिरी यांनी अहमदपूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यात गोसावी समाजासाठी भरीव असे काम करुन आपलं कर्तव्य पार पाडल्या मुळे 2022 चा गौरव कर्तुत्वाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरील राज्यस्तरीय त्रीसुत्री महाअधिवेशनात राज्यस्तरीय पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वधुवर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता.
सदरील महाअधिवेशनाचे उद्घाटन मा.खा.श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष स्थानी योगेश बन नागपूर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते तथा युवा किर्तनकार ह.भ.प.अविनाश भारती तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील उद्योजक सुखदेव गिरी, योगगुरू डाॅ.कुष्णदेव गिरी , सुर्यकांत गिरी , हे उपस्थित होते.महाअधिवेशानाचे आयोजन डॉ.धर्मविर भारती , अनिल पुरी यांच्या पुढाकाराने व गोसावी युवा मंचच्या माध्यमातून करण्यात आले होते.
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, देवदत्त गिरी , पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी,परीवहन अधिकारी.सौ.शितल गोसावी, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, डॉ.विश्रांत भारती ,ह.भ.प.अमित महाराज पुरी ,इजि.गणेश पुरी, विनायक गिरी,संजय भारती , रमेश भारती, प्राचार्य राजेंद्र गिरी, स्वप्नील भारती हे उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त गोविंद गिरी यांचे रमेश गिरी,बकली भारती, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गिरी,डॉ.सौ.माधुरी गिरी, श्रीधर गिरी, बालाजी गिरी, संकेत गिरी, विजय पुरी,अतुल गिरी,ग्यानगिर गिरी, बाबुराव गिरी, सतिश गिरी,बळी पुरी, चंद्रशेखर भारती, दत्ता पुरी यांच्या सह तालुक्यातील समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.