
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर : दिनांक 20 ऑगस्ट रोजी गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवर विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर , बलोपासक मंडळाचे प्रमुख पांचारे रूपा व कलोपासक मंडळाचे प्रमुख बेजगमवार सविता यांच्या हस्ते राधाकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यालयातील वरिष्ठ शिक्षिका कुलकर्णी स्मिता यांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पाठांतर घेतले. विद्यार्थ्यांनी आणलेल्या प्रसादाचे एकत्रीकरण करून गोपाळकाला तयार करून दहीहंडीत भरण्यात आला.जाधव सचिन यांनी गोपाळ काल्याचे महत्व, गोपाळकाला का साजरा करतात या मागचे महत्व विद्यार्थ्यांना कथेद्वारे पटवून दिले. गरीब- श्रीमंत, लहान मोठा असा भेदभाव न करता भगवान श्रीकृष्णाने समाजामध्ये एकता निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे गोपाळकाला व दहीहंडी हा उत्सव सुरुवात केले याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर राधाकृष्ण वेशभूषेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे टिपरी नृत्य सादरीकरण झाले. काही विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या आणि राधेच्या वेशभूषेमध्ये नृत्य सादरीकरण केले. शेवटी श्रीकृष्णांच्या नाम गजराने दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांचे मनोरे तयार करण्यात आले व दहीहंडी फोडण्यात आले व प्रसाद देण्यात आले . या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.सर्व उपस्थित पालकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक देगावकर यांनी आभार व्यक्त केले.हा कार्यक्रम कलोपासक व बलोपासक या मंडळाकडून घेण्यात आला.