
दैनिक चालू वार्ता अहमदपूर प्रतिनिधी -राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूरअहमदपूर अंबेजागाई महामार्गावर लांजी पाटीजवळ एका दुचाकी मोटार सायकल आणी काळवीटची धडक बसुन दोघेही रोडवर पडताक्षणीच पाठीमागुन भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडून पोबारा केल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्रघटनेट दुचाकीस्वार आणी काळवीटचा जागीच मृत्यु झाला. या घटनेने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दि २० ऑगष्ट रोजी रात्री अंदाजे ७ : ३०ते ८ : ०० च्या सुमारास अजय नरसिंग कोदळे ( पाटील ) वय २६ वर्ष रा गोथाळा ता अहमदपूर हे एम.एच १२ क्यु एच ०३९२ या दुचाकीने अहमदपूरकडे येत असताना लांजी पाटी जवळ अचानक सुसाटपणे शेतातुन रस्ता ओलांडणाऱ्या काळवीटाची दुचाकीस्वारास जोराची धडक बसली असता दोघेही रोडवर पडले त्याक्षणी पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडून पोबारा केला सदर मयत अजय कोदळे हा सिध्दी शुगर अॅड आलाईड या कारखाण्यात असिसस्टंट इंजिनिअर या पदावर कार्यरत असल्याचे समजते घटना स्थळी युवक व काळवीट यांच्या शरीराचे अक्षरशहा: चेंदामेंदा झालेला पहावयास मिळाला सदर अपघाताची माहीती अहमदपूर पोलीसांना समजली असता पोलीस निरिक्षक चितांबर कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार, विठ्ठल दुरपडे पोकॉ पद्माकर कांबळे, नारायण बेंबडे, शरद गाडे, लक्ष्मण आरदवाड, पोना तानाजी आरदवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील युवकाचे प्रेत ग्रामीण रूग्नालयात दाखल करून शव विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत