
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर
तालुक्यातील सुनेगाव शेंद्री शेनी आनंदवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सरपंच सौ उषा गोपिनाथ जायभाये व उप सरपंच सौ चंद्रकला मारोती ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडेश्वर शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद यश संपादन केले असून रोकडेश्वर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे १३ च्या १३ संचालक बहुमताने विजयी झाले आहेत. रोकडेश्वर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे प्रल्हाद संभाजी काटे, गोपाळ शिवाजी काळे, रंगनाथ बळीराम गुट्टे, ज्ञानोबा नागनाथ जायभाये, धोंडीराम सुदाम जायभाये, बालाजी धारबा जायभाये, सखाराम माणिक जायभाये, संभाजी किशन थगनर, लक्ष्मीबाई नारायण जायभाये, नरहरी शिवाजी बेले, राम भगवान जायभाये, सिंधु राजु जायभाये, निर्मला पुंडलीक गुणाले हे
उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. सि. संघई यांनी काम पाहिले. हा विजय सुनेगाव शेंद्री शेनी आनंदवाडी येथील शेतकरी ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने या सोसायट्या शेतकऱ्यांचा मुख्य आधार असतो. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जही देण्यात येते. पीक कर्जाबरोबरच खते, बियाणे, शेतीची अवजारे यासाठीही सोसायट्या कर्जपुरवठा करतात. त्यांना व्यवसयाभिमुख करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची योजना आहे.’ असे मत सरपंच सौ उषा गोपीनाथ जायभाये यांनी मांडले.
या विजयाबद्दल सुनेगाव, शेंद्री, शेनी, आनंदवाडी येथील समस्थ ग्रामस्थ मंडळींनी नुतन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.