
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी-मन्मथ भुस्से
शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर व तहसील कार्यालय,अर्धापूर च्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करून अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात आले.
या मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एक मिनिट व्हिडिओ मेकिंग, पोस्टर मेकिंग स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विजेते स्पर्धकांना तहसील कार्यालय,अर्धापूर च्या तहसीलदार उज्ज्वला पांगारकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या मध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेत आदित्य जडे याने प्रथम पारितोषिक प्राप्त केले. प्रमोद भंगारे याने द्वितीय , तृतीय क्रमांक कृष्णा तिळेवाड यांनी प्राप्त केला. रांगोळी स्पर्धेमध्ये सानिका गावंडे यांनी प्रथम क्रमांक तर अंकिता क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एक मिनिट व्हिडिओ मेकिंग स्पर्ध्येत ओमकार सिंनगारे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.तर अविनाश मनोहर सूर्यवंशी यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. निबंध स्पर्धेमध्ये प्रशांत क्षीरसागर यांनी प्रथम करून प्राप्त केला.गणेश पटवे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर ओमकार सिंगारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.अशा प्रकारे विजेत्या स्पर्धकांना तहसील कार्यालय अर्धापूर च्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत 100 तिरंगा ध्वज वितरण करण्यात आले. सदरील स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.रघुनाथ शेटे,डॉ.एस.जी.बिराजदार,यांनी परिश्रम घेतले.