
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृती सजावटीचे उद्घाटन ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी होणार असून, श्रींची प्रतिष्ठापना पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदा १३० वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. गणेश चतुर्थीला सकाळी ११वा. ३७ मिनिटांनी श्रीं ची प्रतिष्ठापना होणार आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टतर्फे महेश सूर्यवंशी आणि हेमंत रासने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. बाळासाहेब ऊर्फ रामचंद्र परांजपे, सुनील रासनेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे. काम अंतिम टप्प्यात आले आहे.