
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नांदेड जिल्ह्यांचे तरुण आणि तडफदार शिस्तप्रिय जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांचे नागपूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यांत आली असल्यांचे आदेश दि.१८ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी काढले. नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती. विमला आर यांच्या जागी डॉ.विपिन इटणकर यांची बदली करण्यांत आली आहे. सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सल्ल्यांने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून मी नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असा आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले असून डॉ. विपिन इटनकर यांनी १७ फेब्रुवारी २०२० रोजी नांदेड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. गुरुवारी १८ ऑगस्ट रोजी त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या किल्ल्यांत म्हणजेच नागपूर येथे बदली करण्यांत आली त्यांनी कोरोना काळात माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत योग्य नियोजन आणि प्रशासनांला हाताशी घेवुन नांदेड जिल्ह्यांत अनेक चांगली कामे केली आहेत. नांदेड जिल्ह्यांचा कार्यभार सोडताना तब्बल दोन दिवसानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुक अकाउंट वरुन धन्यवाद नांदेडकर म्हणून एक पोस्ट शेअर केली होती त्यांची ती पोस्ट चांगलीच वायरल झाली होती. त्यांमध्ये त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत नांदेडकरांचे विशेष भावनिक आभार मानले. यावेळी माजी जिल्हाधिकारी विपिन इटनकर पुढे म्हणाले… नांदेडकर सर्वांना माझा नमस्कार… मी अडीच वर्षांपूर्वी ऐतिहासिक नांदेड शहरांत जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो होतो. येथे मला अनेक विकासकामे करण्यांची संधी मिळाली सर्वच कामात मला जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे मोठे सहकार्य मिळाले. नांदेड मध्ये काम करताना मला सामान्य नागरिकांकडूंन मिळालेल्या प्रेम,आदर माझ्या सदैव स्मरणांत राहील.नांदेडची कारकीर्द मला कधीही विसरता येणार नाही. मी नागपूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पुन्हा एकदा माझ्या नांदेडकरांचे मनापासून आभार मानतो.